|| Shree ||
|| श्री ||
|| अथ संकष्टनाशनं गणेशस्तोत्रं ||
|| श्री गणेशाय नम: ||
नारद उवाच -
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् |
भक्तावासं स्मरेन्नित्यम् आयु:कामार्थ सिद्धये || १ ||
प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् |
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् || २ ||
लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च |
सप्तमं विघ्नराजं च धूम्रवर्णं तथाष्टमम् || ३ ||
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् |
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् || ४ ||
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर: |
न च विघ्नभयं तस्य सर्व सिद्धिकरं प्रभो: || ५ ||
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् |
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् || ६ ||
जपेद् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत् |
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: || ७ ||
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत् |
तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादत: || ८ ||
इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं नाम गणेशस्तोत्रं संपूर्णम् ||
अर्थ :
श्री गणेशाला नमस्कार असो. महर्षी नारद म्हणाले -
आयुष्य वाढावे , सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि संपत्ती मिळावी यासाठी ; भक्तांचे आश्रयस्थान असलेला असा जो गौरीचा पुत्र प्रभू विनायक , त्याला नतमस्तक होऊन , वंदन करून त्याचे स्मरण करावे. (१)
त्याचे पहिले नाव वक्रतुंड , दुसरे एकदंत , तिसरे कृष्ण-पिंगाक्ष आणि चौथे गजवक्त्र आहे. (२)
पाचवे नाव लंबोदर आणि सहावे विकट असे आहे. सातवे विघ्नराज त्याचप्रमाणे आठवे धूम्रवर्ण आहे. (३)
नववे नाव भालचंद्र , दहावे विनायक , अकरावे गणपती आणि बारावे गजानन असे आहे. (४)
अशा त्या गणेशाचे नित्य स्मरण करवे.
फलश्रुती :
जो मनुष्य सकाळ , दुपार व संध्याकाळ अशा तीनही वेळा ह्या बारा नावांचे पठण करील त्याला कधीही संकटांचे भय राहणार नाही. खरोखरी सर्वसिद्धी मिळवून देणारे हे प्रभू गणेशाचे स्तोत्र आहे. (५)
ह्या स्तोत्राच्या पठणाने विद्या इच्छिणाऱ्याला विद्या , धन इच्छिणाऱ्याला धन , पुत्र इच्छिणाऱ्याला पुत्र आणि मोक्ष इच्छिणाऱ्याला मोक्ष मिळतो. (६)
ह्या गणपतिस्तोत्राचे जो नित्यनेमाने पठण करील त्याला सहा महिन्यातच त्याचे फळ मिळेल आणि वर्षभरात (अलौकिक) सिद्धी प्राप्त होईल , यात काहीही संशय नाही. (७)
जो कोणी हे स्तोत्र (वेगवेगळे) लिहून काढून ते आठ ब्राह्मणांना अर्पण करील त्याला गणपतीच्या कृपेने सर्व प्रकारची विद्या प्राप्त होइल. (८)
नारद पुराणातील 'संकष्ट नाशन ' नावाचे गणेश स्तोत्र (ह्याप्रमाणे) समाप्त .
----------------------- शुभं भवतु ---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा