गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०१५

prarambha

।। प्रारंभ ।।
श्री गजाननाला वंदन करून ह्या ब्लॉग चा श्री गणेशा करीत आहे .
ह्या  ब्लॉग चा मुख्य उद्देश असा कि मराठी तसेच भारतीय संस्कृती बद्दलची माहिती संकलित करण्याची गरज नजीकच्या भूतकाळात वाटली . ह्याचप्रमाणे, आपल्याकडील पारंपारिक ज्ञानाचा जो अनमोल खजिना आहे तो देखील एका ठिकाणी संग्रहित करावा अशी इच्छा मनात प्रबळ झाली . नवीन युगात सर्व महिती इंटरनेट वर उपलब्ध असतेच. माझ्या ब्लोग मधून ती विखुरलेली माहिती शक्य तितक्या प्रमाणात संकलित करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न. ह्या प्रयत्नाला तुमचा सर्वांचा प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा.


श्री वरद विनायकाच्या  आशीर्वादाने व तुम्हा सर्वांच्या मदतीने हा ब्लॉग माहिती आणि ज्ञानाचा एक वटवृक्ष व्हावा.

अनेक ठिकाणी संस्कृत वचने तसेच संस्कृत साहित्य लिहिले आहे. तसेच इतरहि मराठी साहित्य जेथे शक्य आहे ते ते पुन्हा मी येथे लिहून काढले आहे. ह्या लिखाणात सर्वतोपरी प्रयत्न केला आहे कि व्याकरण दृष्ट्या तसेच शुद्ध लिखाण घडावे . ह्यामध्ये कुठेही काहीही त्रुटी आढळल्यास कृपया निदर्शनास आणावी जेणे करून ती दुरुस्त करता यावी . पुढील पिढीला जर हि माहिती मिळवण्याचे प्रयत्न करायचेच आहेत तर ती माहिती योग्य पद्धतीने व शक्य तितक्या प्रमाणात शुद्ध आणि बरोबर असावी हा उद्देश आहे .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा